Ind vs Aus : भारताने मालिकविजय साकारला
शहीद वीर नारायणसिंह इंटरनॅशनल स्टेडियम, रायपूर येथे Ind Vs Aus टी-२० मालिकेतील ४था सामना खेळला जात आहे. या मालिकेतील भारताने २ तर ऑस्ट्रेलिया ने १ सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
यशस्वी ची ताबडतोब फटकेबाजी व झटपट गडी बाद
भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. तर ऑस्ट्रेलिया कडून एरॉन हार्डी पाहिले षटक घेऊन आला. हार्डीने पाहिले ५ चेंडू निर्धाव टाकत यशस्वीला खाते खोलू दिले नाही.
पण यशस्वी थांबेल तो कसला? त्याने पुढच्या षटकांमध्ये ताबडतोब फलंदाजी करताना ७ वेळा चेंडूला ला सीमारेषेपार पाठवले. ६ चौकार व एक षटकाराच्या मदतीने त्याने २८ चेंडूत ३७ धावा काढल्या. हार्डीला मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला.
यशस्वी बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. परंतु श्रेयस आपली चमक दाखवू शकला नाही. तन्वीर सांघाच्या गोलंदाजीवर ख्रिस ग्रीनने सीमारेषेजवळ त्याचा झेल टिपला.
कर्णधार सूर्यकुमार यादव आल्याबरोबर लगेचच बाद झाला. सूर्याकुमार २ चेंडूत फक्त१ धाव काढून यष्टिरक्षक वेड् कडे झेल देऊन बाद झाला. धावफलकावर ६३ धावसंख्या असताना भारताचे ३ फलंदाज तंबूत परतले होते.
आज वरच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रिंकू सिंग आणि ऋतुराजने मिळून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी १३ व्या षटकात भारताची धावसंख्या १०० च्या आकड्यापार पोहचवली.
ऋतुराज आणि रिंकूने चांगल्या प्रकारे डाव सावरला होता तोच तन्वीर सांघाच्या फिरकीवर ऋतुराज झेलबाद झाला. त्याने २८ चेंडूत ३ चौकार व १ षटकार मारत ३२ धावा काढल्या.
रिंकू जितेशची वेगवान भागीदारी
रिंकूने आज खेळण्याची संधी मिळालेल्या जितेश शर्मा बरोबर ५८ धावांची वेगवान भागीदारी करत भारताची धावसंख्या सुस्थितीत पोहचवली. फटकेबाजी करताना जितेश झेलबाद झाला.
१९ व्या षटकात रिंकूही बाद झाला. रिंकूने तडाखेबंद फलंदाजी करताना २९ चेंडूत ४६ धावा केल्या. दरम्यान त्याने ६ वेळा चेंडूला सीमारेषापार पाठवले. त्यांनतर आलेले अक्षर पटेल, दीपक चाहर विशेष कामगिरी करू शकले नाहीत. एका पाठोपाठ फलंदाज झटपट बाद होत गेले. डावाच्या शेवटच्या सत्रात ऑस्सी गोलंदाजांचा वरचष्मा राहिला.
२० षटकांमध्ये भारतीय संघाने ९ गडी बाद १७४ अशी धावसंख्या उभारली व ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुईस ने सर्वात जास्त ३ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची दमदार सुरुवात
ऑस्ट्रेलियाचे सलामीचे फलंदाज ट्रविस हेड आणि जोस फिलिप्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात जोरदार फटकेबाजीने केली. हेडने वेगवान खेळी करताना दीपक चाहारच्या एकाच षटकात २२ धावा काढल्या.
दीपक चाहारच्या महागड्या षटकानंतर रवी बिश्नोई ने फिलिप्सला त्रिफळाचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यांनतर आलेल्या बेन मॅकडेमोर्टने हेडची साथ देण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या ४४ वर असताना हेड अक्षर पटेलच्या फिरकीचा शिकार झाला.
दमदार सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाजी समोर कांगारूंचा डाव गडगडला
त्यांनतर आलेले ऑस्ट्रेलियन फलंदाज विशेष अशी कामगिरी करू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी ऑलराऊंड गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ७ गडी बाद १५४ धावांवर रोखले.
भारताकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेलने ४, दीपक चाहारने २, तर रवी बिश्नोई आणि आवेष खान यांनी प्रत्येकी एक असे गडी बाद केले. अक्षरने ४ षटकांमध्ये १६ धावा देत ३ विकेट्स काढल्या.या कामगिरीमुळे अक्षर सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला.
भारताचा मालिकाविजय
या सामन्यातील विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने जिंकत मालिका आपल्या खिशात घातली आहे. मालिकेतील ५ वा सामना केवळ एक औपचारिकता म्हणून ३ डिसेंबर रोजी बँगलोर येथील चिन्नास्वामी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल.
FAQs
१)Ind Vs Aus टी-२० मालिकेतील पाचवा सामना कोठे होणार आहे?
– Ind Vs Aus टी-२० मालिकेतील पाचवा सामना चिन्नास्वामी स्टेडियम, बँगलोर येथे होणार आहे.
२)Ind Vs Aus टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक कोणी जिंकली?
– Ind vs Aus टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
३)जगातील सर्वाधिक टी-२० सामने जिकणारा संघ कोणता?
– भारत हा सर्वाधिक १३६ सामने जिंकून जगातील सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा देश बनला आहे. त्याच्या पाठोपाठ पाकिस्तान हा देश येतो.
४) Ind Vs Aus मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार कोण होता.?
– Ind Vs Aus मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर हा होता.
५) Ind Vs Aus मालिकेतील चौथ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार कुणाला देण्यात आला?
– Ind Vs Aus मालिकेतील चौथ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार अक्षर पटेलला देण्यात आला.
1 thought on “Ind Vs Aus 4th T-20 : भारताने मालिका जिंकली”